मन से जो रावण निकाले राम उसके मन मे है !

1

मन से जो रावण निकाले, राम उसके मन मे है !

जन्मापासून ते मृत्यू पर्यंतचा प्रवास काही सोपा नसतो. जन्म राम देतो, आत्म्यात राम आहे, पण जस जसे शरीर रूप घेत जातं आणि मोहात फसत जातं तसा तसा रावण आपल्यात जागा बनवायला लागतो.राम आहे की नाही? हा प्रश्न सुद्धा तेव्हाचं उपस्थित होतो जेव्हा आतला रावण आपल्याला व्यापून घेतो. आणि मग आपण प्रत्येक प्रश्नात आणि जीवन जगण्याच्या कोड्यात फसत जातो.
आता येथे हा पण प्रश्न उपस्थित केल्या जातो की रावण तर महादेवाचा भक्त होता. मग देवाची साधना करून सुद्धा तो चुकलाचं ना? तर देवाची साधना करून तुम्ही कुठले कर्म करता यावर देव तुम्हाला फळ देत असतो. रावणाने मर्यादा ओलांडली त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले. पण मग आपण जीवन जगत असतांना आपण कसा रावण ओळखायचा? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर जे वाईट काम करण्या पहिले एक क्षण जरी मनाला वाटेल की हे चुकीचे आहे तो आहे राम. आणि जीवनात छोट्या छोट्या चुका होतचं राहतात म्हणत म्हणत पुन्हा पुन्हा चुका करणे तो आहे रावण.
राम आत्मा आहे तर रावण मन आहे. प्रत्येक माणसाचा आत्मा हा शुद्धचं असतो पण मन मात्र अस्थिर असतं, जे आपल्याला मोहात टाकतं आणि आपल्याकडून कृती करवून घेतं. मग प्रत्येक प्रश्नाला प्रति प्रश्न रावण करतो म्हणजेचं आपलं आंतरिक मन आपल्याशी करायला लागतं. की मीचं कसा काय चूक आणि तुचं कसा काय बरोबर? आणि मन जेव्हा आपल्यावर हावी व्हायला लागतं तेव्हा एक गोष्ट समजून घेणी महत्वाची असते ती म्हणजे की रावणाची शक्ती वाढत चालली आहे आणि आपल्या आत्म्यावर तो हावी होत चालला आहे.
रामा पर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्कीचं इतका सोपा नसतो, कारण आपण लहानपणी पासून आत्मा विसरून शरीराचे चोचले पुरवत आलेलो असतो.त्यामुळे रामाला आपण ओळखूचं शकत नाही. आणि जेव्हा एखादी घटना आपल्याचं सोबत घडते तेव्हा आपण रामाला शोधायला निघतो.
आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर. म्हणून पहिले आपण आत्म्याचा शोध घेणं गरजेचे आहे. समाजातील वाईट कृत्य हे मन हावी होणे म्हणजेचं रावणाने शरीराचा ताबा घेतल्या मुळे होतात. म्हणून प्रत्येकाने आतील रावण आणि राम ओळखणे गरजेचे आहे. मर्यादेत राहून जीवन जगणे गरजेचे आहे, त्याग करणे गरजेचे आहे, आणि रोज आपल्याचं शरीराची साधना करणे गरजेचे आहे म्हणजे राम भेटल्या शिवाय राहणार नाही आणि रावण मेल्या शिवाय. मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही, कारण राम इतक्या सोप्या मार्गाने भेट देत नाही, त्यासाठी वनवास पण भोगता आला पाहिजे. मन स्थिर झाले की राम भेटतो आणि आत्म्यासोबत मनाची सुद्धा अयोध्या झाल्या शिवाय राहत नाही.आणि जेवढे आपण रामाच्या जवळ जात जातो तितका हनुमान आपल्या जवळ येत जातो. मर्यादा ही जीवन है. श्री राम जय राम जय जय राम. फोटो साभार – kavishaladaily.

 

  • अभिषेक म पत्की.

 

लेखक हे व्यवस्थापन विषयातील स्ंनातकोत्तर असून सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच सामाजिक व इतिहास विषयाचे अभ्यासक आहेत.

1 Comment
  1. Nishant Patil says

    🙌🙌

Leave A Reply

Your email address will not be published.