मंद प्रकाशातला निधड्या छातीचा वीर

नरेंद्र मोदीजींनी रविवारी रात्री ९ वाजता दिवा लावण्याचे केले आवाहन.

5

मंद प्रकाशातला निधड्या छातीचा वीर

आज संपूर्ण विश्व कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रासले आहे. अमेरिका चीन सारखे बलाढ्य प्रगत देश परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत. लाखोंची जनता कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडली आहे. हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत आजपर्यत सुमारे ६० लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांनी तशी अमेरिकी सरकारकडे नोंदणी केली आहे. अनेक परिवार घरातील प्रमुख व्यक्ती गमावल्यामुळे अक्षरशः रस्त्यावर आले आहेत.

युरोपात तर अवस्था भयावह आहे. रोज हजारो लोक करोनामुळे बळी पडत आहेत. लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. तिथली वैद्यकीय व्यवस्था तर पार कोलमडली आहे. इटलीचे पंतप्रधान तर त्यांचा देश ज्या परिस्थितीमधून जात आहे ते पाहून अक्षरशः रडले. व्हटिकनचे धर्मगुरू पोप यांनी जगातील सर्व ख्रिश्त बांधवाना एकाच वेळी एका विशिष्ठ दिवशी देवाची प्रार्थना करायचे आवाहन केले आणि जगभर लोकांनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन देवाची प्रार्थना केली.

हि सर्व परिस्थिती हा निधड्या छातीचा वीर समजून घेऊन माझ्या १३० कोटी जनतेला या सगळ्यातून कसे वाचवता येईल याचा विचार करत होता. आपल्या देशातील एकंदर लोकांची मानसिकता, उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सोयीसुविधा, भविष्यात अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम पाहून निर्णय कसा घ्यायचा हे ठरवत होता. यातून श्रींमत गरीब कोणीही सुटणार नव्हते याची खात्री त्याला पटली होती. सारासार विचार करून कमीत कमी झळ माझ्या देशबांधवांना कशी बसेल याचा विचार करत होता.

मग निर्णय व त्याची अंमलबजावणी सुरु झाली. सर्वप्रथम सर्व परदेशी नागरिकांचे हिंदुस्थानांत येण्यासाठी दिलेले परवाने रद्द करण्यात आले. हिंदुस्थानांत परदेशांतून येणारी सर्व विमाने येण्यावर बंदी घालण्यात आली. परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी परत सुखरूप आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी विमानतळावरच करून गरजेप्रमाणे करोनाबाधित रूग्णांना विलगीकरण करून मोफत उपचार सुरु करण्यात आले. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन तसे निर्देश देण्यात आले. तोपर्यत करोनाचा प्रसार रोखण्यात जगाच्या तुलनेत हिंदुस्थान बऱ्याचअंशी यशस्वी झाला होता.

आता करोना पुढे वाढू नये यासाठी पुढची रणनीती आखायची होती. देशातील लोकांची मानसिकता या निधड्या विराला तळागाळात काम केल्यामुळे चांगलीच माहिती होती. सगळी निर्णय क्षमता असताना सुद्धा आणीबाणी सारखा काळा निर्णय घ्यायचा नव्हता. प्रसार माध्यमांची गळचेपी करायची नव्हती. या सगळ्या बाबींचा विचार करून करोनाचा प्रसार जर रोखायचा असेल तर यावर औषध एकच आहे ते म्हणजे सामाजिक अंतर(Social Distance) हे आता सिद्ध झाले होते.

चीनसारखा हुकुमशाही देशाने यासाठी बळाचा वापर केला लोकांना घरात कोंडले दारावर खिळे/फळ्या ठोकण्यात आल्या. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. आपल्या जवळच्या प्रियजनांना करोनामुळे मृत झालेल्यांचे शेवटचे दर्शनसुध्दा घेऊ दिले नाही. धर्माच्या विरोधात जाऊन प्रेताचे दफन करण्याऐवजी दहन करण्यात आले. इतके कडक निर्णय चीनने घेतले.

हिंदुस्थानात बळाचा वापर न करता भावनिक आवाहन करायचे होते. तो दिवस उजाडला आज हा निधड्या छातीचा वीर हिंदुस्थानांतील जनतेला काय आवाहन करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या वीराने तमाम हिंदुस्थानी जनतेला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि या संकटकाळी फक्त एक दिवस घरी राहायचे आवाहन केले. या कठीण काळात आपले डॉक्टर पोलीस व सर्व अत्यावश्यक सेवा देणारे सहायक यांचे संध्याकाळी ५ वाजता टाळ्या/थाळ्या वाजवून आभार मानावे अशी भावनिक साद घातली.

आणि काय आश्चर्य त्यादिवशी तमाम हिंदुस्थानी जनतेने जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद दिला. सगळा हिंदुस्थात या दिवशी थांबला. या निधड्या छातीच्या विराच्या आवाहनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तमाम हिंदुस्थानी जनतेने डॉक्टर पोलीस व सर्व अत्यावश्यक सेवा देणारे सहायक यांचे आपल्या घरातूनच मोठ्या जल्लोषात आभार मानले, हिंदुस्थानाच्या इतिहासात या आवाहनास हिंदुस्थानी जनतेने इतका प्रचंड प्रतिसाद दिला याचे हे कदाचित पहिलेच उदाहरण असावे. त्याचे मुख्य कारण एकच या निधड्या छातीच्या वीरावर असलेला जनतेचा प्रचंड विश्वास. आता पर्यत केलेल्या कामाची जणू ती पावतीच होती कि तमाम जनता या कठीण प्रसंगी या वीराच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहिली.

देशातील परिस्थिती जास्त चिघळू नये करोनाचा प्रसार जास्त होऊ नये म्हणून या निधड्या वीराने अजून कडक निर्बंध व खबरदारी/ काळजी घ्यायचे ठरवले. परत या वीराने जनतेला फक्त तीन आठवडे घरी राहण्यासाठी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले. जनतेने ते स्वीकारले आणि त्याचे पालन करू लागले. सर्व अत्यावशक सेवा नीट चालू ठेवल्या. ज्या ठिकाणी काही कमतरता होत्या त्या त्या राज्य सरकारला सांगून त्या नीट कश्या होतील याचा पाठपुरावा केला. राज्यांना व देशातील नागरिकांना त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली.

या काळात या निर्णयाविरोधात लोक रस्त्यावर येतील देशात गदारोळ कसा माजेल असे समाजातील काही देशविरोधी घटक व समाजकंटक शक्ती याची वाट पहात होते. करोनाचे रुग्ण देशात वाढल्यावर या निधड्या वीरावर सपासप वार करून याला धारातीर्थी कसे पाडू याचे अगोदरच प्रयत्न चालू होते. परंतु तसे काही घडत नव्हते देशातील नागरिक एका वीराच्या आवाहनावर हे सगळे सहन करत होते त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहात होते.

इथेच ठिणगी पडली आजपर्यंत हिंदुस्थानवर राज्य केलेल्या लोकांच्या राजकीय आणि पुरोगामी विचारधारेला हा मोठा धक्का होता. यांना हे सगळे पचनी पडत नव्हते. आपण अनुभवले आहे की या विचारसरणीच्या लोकांच्या आवाहनाला साद देऊन कोणीही फिरकत नाही. उठल्यासुठल्या प्रकरणात मेणबत्ती मोर्चा काढायला लोक पैसे देऊन सुद्धा येत नाहीत. या प्रकरणी कायम चर्चेत व प्रसिद्धीत राहण्यासाठी काही निवडक पत्रकार व प्रसारमाध्यमे यांना पैसे देऊन प्रसिद्धी करावी लागते. या निधड्या विराला इथेच जर थांबवले नाही तर आपली कारकीर्द लवकरच धोक्यात येईल आता याला कसे थांबवावे याच्यासाठी स्वार्थी लोक सक्रीय झाले. यांचा हेतू फक्त नि फक्त या निधड्या वीरावर कसा वार करता येईल त्याने घेतलेल्या निर्णयावर टीका कशी करता येईल एवढाच झाला होता.

याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली आहे. हळूहळू देशातील वैद्यकीय सेवा कश्या तुटपुंज्या आहेत याचे प्रसार माध्यमे व समाज माध्यमे यांच्या मार्फत प्रचार सुरु करण्यात आला. ९५ टक्के जनता सामाजिक अंतर(Social Distance) पाळत असतांना फक्त ५ टक्के जनता कसे नियमाचे उल्लंघन करत आहे याचेच जास्त चित्रण दाखवण्यात येत आहे. *एक विशिष्ठ समाज रोज प्रार्थना करत असताना करोना पसरवत असल्याचे चित्र समोर दिसत असतांना सुद्धा एकही पुरोगामी या समाजाला काही काळ प्रार्थना करू नका, करोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करा असे सांगायचे धाडस दाखवू शकला नाही.* या अगोदर या देशात बऱ्याच लोकांना हा देश असुरक्षित वाटत होता असहिष्णु वाटत होता त्यातला एकही जण या एकजुटीच्या वेळी पुढे आला नाही. अश्या मानवताविरोधी घटनेचा निषेध केला नाही. इतर वेळी हे सगळे लोक एकत्र येऊन या निधड्या वीरावर सतत वार करत असतात.

दिल्लीमधील करोनामुळे स्थलांतर करणारे कामगार यांचे अतिरंजित चित्रण केले गेले. गरीब लोक व त्यांचे परिवार शेकडो किलोमीटर चालत कसे गेले याच्या कहाण्या बनवण्यात आल्या. छोटी मुले स्त्रिया चालतांना कश्या उपाशी राहिल्या, चालत असताना काही लोक मृत्यमुखी पडले, त्यांच्यावर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्यावर घातक ओषधी फवारे मारण्यात याचे परदेशात अनेक वृत्तपत्रात लिखाण केले गेले. हे सगळे चित्रण समाज माध्यामातून सगळीकडे पसरवून हा वीर कसा दोषी आहे हे बिंबवले गेले. खरेतर या गरीब लोकामध्ये अगोदरच अफवा पसरवण्यात आल्या होत्या. या नागरिकाचे वीज पाणी बंद करण्यात येणार आहे अशी माहिती पसरवण्यात आली होती. या लोकांसाठी सोई करणे हि जबाबदारी राज्य सरकारची असते पण यात दोषी मात्र हा निधडा वीरच होता असे पढवले गेले.

या सगळ्यांचा उद्देश एकच होता या गरीब लोकांची सोय केली नाही म्हणून डोकी भडकवून सगळे केलेले प्रयंत्न हाणून पाडायचे आणि संपर्ण देशात यादवी माजवायची. परंतु यावेळीही या पुरोगामी लोकांचा हा प्रयत्न फसला. या गर्दीतील एकही हिदुस्तानी नागरिकाने हातात दगड घेतला नाही. एकाही सरकारी गोष्टीचे नुकसान केले नाही कोणतीही जीवितहानी व वित्तहानी केली नाही. सगळे सहन केले स्वतःच्या परिवारासाठी आणि या निधड्या वीराच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी.

सगळा देश गेली काही दिवस या वीराच्या आवाहनाचे पालन करत आहे. सामाजिक अंतर(Social Distance) पाळत आहे. या काळात देशाला एकसंध ठेवायची गरज असते या कठीण काळात मनोधैर्य वाढवायचे असते. त्यासाठी हा निधडा वीर सतत जनतेशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहे. त्याच्या एका आवाहनावर अनेक उद्योगपतींनी करोडो रुपये करोनाविरोधात लढवण्यासाठी दिले. अनेक सामान्य नागरिक शेतकरी आपल्यापरीने मदत करत आहेत. जातीच्या पलीकडे जाऊन हिंदुस्थान एकत्र आला आहे हि बाब काही समाजकंटकांना खटकत आहे.

या निधड्या छातीच्या वीराने जी काही करोनाविरोधात पावले उचलली आहेत त्यामुळे आपल्या देशात याचा संसर्ग अजूनही देशाच्या लोकसंखेच्या मानाने कमी आहे . याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. अनेक देश हिंदुस्थानकडून मदत घेऊन करोनाविरोधात लढत आहेत. या निधड्या छातीला विराला आज गरज आहे करोनाविरोधातील लढाईतील आपल्या सहभागाची.

मला विश्वास आहे हा निधड्या छातीचा वीर हिदुस्तानी जनतेला मंद प्रकाशातून पुन्हा एकदा तेजस्वी हिंदुस्थानाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.
चला तर मग एकतेचा दीप लाऊया आणि हिंदुस्थानला तेजस्वी करुया.

  • नंदकुमार शरद घोडके, पुणे. 

( फोटो आंतरजालावरून साभार)

+30

लेखक हे पुणे महाराष्ट्र येथील रहिवासी असून, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, शेती व माहिती तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत.

5 Comments
  1. Aashish Paskanti says

    उत्तम लेख..

    +1
  2. Ranjeet Bhelke says

    Great… You could display a perfect picture of what is happening in and around us… High command on language….

    +1
    1. Vishal says

      अतिशय योग्य शब्दात सद्यपरिस्थितीच चित्र मांडले.???
      Salute to PM Saheb for great efforts which they are doing for country!
      तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना !

      0
  3. Mangesh Pandhare says

    अतिशय अभ्यासपूर्वक लिखाण व सुंदर वर्णन केले आहे आपण,मला खात्री आहे की या निधड्या छातीच्या विरावर विश्वास ठेवला तर भारत लवकरच महाशक्ती म्हणून उदयाला येईल. आपणास शुभेच्छा?

    +2
  4. जय हिंद

    0
Leave A Reply

Your email address will not be published.