मराठा राज्यकर्त्यांना नेमका कोणता धर्म अभिप्रेत होता ?

0 525

मराठा राज्यकर्त्यांना नेमका कोणता धर्म अभिप्रेत होता ?

————————————————-

1) हळकोळण (गोवा) येथील छत्रपती शंभुराजांच्या शिलालेखात स्पष्टपणे ‘हिंदुराज्य’ असा शब्द आला आहे.

संदर्भ – गोवा राज्य वस्तुसंग्रहालय,पणजी

2) महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्रात स्पष्टपणे ‘हिंदुराज्य’ हा शब्द आला आहे. सर्वांनी एकदिल होण्याची गरज यशवंतराव व्यक्त करतात. कशासाठी एकदिल व्हायच ? तर स्वधर्माचार पूर्ववत होऊन हिंदुची कायमी रहावी. ते लिहीतात “आजपर्यंत हिंदू राज्य सर्वत्रांनी एकदिल राहून चालविले. अलीकडे ज्याचे त्याचे दौलतीत घरकलह होऊन राज्य विपर्यास पडोन हिंदूधर्म नाहीसा होण्यास मूळ जाहले. त्याचे छेदन करण्यास सर्वानी एकदिल झाले पाहिजे. तरच मुळाचे छेदन होऊन स्वधर्माचार पूर्ववत चालून हिंदूची कायमी राहील.”

– महाराजा यशवंतराव होळकर यांचे श्रीनिवास भवानराव प्रतिनिधी यांना पत्र

संदर्भ – 1) ऐतिहासिक लेखसंग्रह, भाग – 15

3) कोल्हापुर छत्रपती ‘हिंदुपदपातशाह’ अशी पदवी लावत. ती आजतागायत सुरु आहे.राजर्षी शाहुमहाराजांच्या कोटावर जरीकामातील बॅज होता,त्यावरही ‘हिंदुपदपातशाह’ अशीच अक्षरे होती.

संदर्भ – राजर्षी शाहु स्मारक ग्रंथ,पान क्र – 1133 ,डाॅ.जयसिंगराव पवार

4) महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांवर पोवाडा लिहिला त्यात ते म्हणतात तोरणा किल्ला घेऊन शिवबांनी ‘हिंदुचा झेंडा रोविला’

संदर्भ – महात्मा फुले समग्र वाड्मय, सहावी आवृत्ती, पान क्र -52 , महाराष्ट्र शासन

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दि. 25 नोव्हे. 1949 रोजी घटना समितीत जे शेवटचे भाषण झाले ,त्यात ते शिवाजीमहाराज हे ‘हिंदुच्या’ मुक्ततेसाठी संघर्ष करत होते,असा उल्लेख करतात.

संदर्भ – डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे खंड -7 ,पान क्र – 188 , महाराष्ट्र शासन

मराठ्यांच्या डोळ्यासमोर कोणता धर्म होता,याचे उत्तर स्पष्ट आहे. याविषयी स्वत: छत्रपती, मराठ्यांचे सेनानी आणि अन्य महापुरुष काय म्हणतात ,हे ऐतिहासिक पुराव्याच्या तथ्यावर तपासून वाचकांनी लक्षात घ्यावे.

– रवींद्र गणेश सासमकर.

 

photo – Google साभार.

लेखक सामाजिक आणि इतिहास विषयाचे अभ्यासक आहेत. संदर्भासाहित लेखाची मांडणी करण्यात लेखकाचा हातखंड आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.