तुमचं तुमच्या आईवर प्रेम असेल, तर ही गोष्ट वाचताना तुम्हाला गलबलून आल्याशिवाय रहाणार नाही. सन २०११ मध्ये ‘सकाळ’ वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करत होतो तेव्हा लिहिलेलं हे ललितकाव्य आहे. माझी आई नुकतीच देवाघरी गेली होती. वडील रुग्णशय्येवर होते. आणि मी सकाळसाठी स्तंभलेखन करत होतो. हेमंत जुवेकर हा माझा तरल, हळव्या मनाचा मित्र त्यावेळी तिथे डेस्कला होता. (अजूनही आहे.) तो मला असं चांगलं चांगलं लिहायला उद्युक्त करायचा. मला फ़ुलवायचा. कलाकाराच्या फ़ुलण्याचाही एक क्षण असतो. त्याचा सूर लागावा लागतो. तिथे हडेलहप्पी करुन चालत नाही. हेमंतकडे ती कला होती. त्याकाळात मी माझ्या आयुष्यातलं सर्वोत्तम लिखाण केलं.
ही म्हाताऱ्या आईची गोष्ट त्याच मालिकेतली. ती वाचून मधु मंगेश कर्णिकांनी स्वत:हून फोन केला होता, आणि आपण हेलावून गेल्याचं सांगितलं होतं.
तुम्हाला विनंती आहे, ही गोष्ट नुसतीच वाचू नका. अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोहोचू द्या. त्यामुळे तुमचा तुमच्या आईवडीलांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर माझी प्रतिभा सत्कारणी लागली असं मी समजेन. माझ्यासाठी तो ज्ञानपीठाहून मोठा पुरस्कार असेल.
हो… आणि आईवर प्रेमही करा….!
-प्रसाद कुलकर्णी ?
Motivational Speaker
9969077133