पानिपत स्मृती दिवस..

पौष शुद्ध अष्टमी बुधवार १४ जानेवारी १७६१.

0

१४ जानेवारी १७६१. हा पानिपत युद्धाचा स्मरण दिवस !

“दोन मोती गळाले, दहा-वीस अश्रफी गेल्या, खुर्दा-रुपयांची तर गणतीच नाही…” पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याच्या झालेल्या हानीचं हे वर्णन अनेक पिढ्यांनी ऐकलं आहे.

“कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अती.!
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती – गोविंदाग्रज.

महाराष्ट्राच्या प्रत्येक उंबरठ्याने राष्ट्रहितासाठी वाहिलेली समिधा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची सर्वोच्च शौर्यगाथा म्हणजे पानिपत.

देव देश आणि धर्मासाठी मराठी मूलूखापासून कोसो दूर मरणालाही मारत, आपल्या प्राणाची आहुती देत तांडव करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना शत शत नमन !

हर हर महादेव !

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.