राज्यातील तरुण-तरुणींना जर्मनीत रोजगाराची संधी.

0 144

जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यांसोबत महाराष्ट्र सरकारने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भातील सामंजस्य करार केला आहे. याच करारानुसार ठाणे जिल्ह्यातील होतकरूंना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी जर्मनीतील बाडेन-वूटेनबर्ग या राज्यामध्ये १० हजार तरुणांना रोजगार देण्यासाठी व त्यांना यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी ७६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

यासाठी 10 वी पास ते 12 वी पास पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील तुम्हाला शासनाद्वारे दिले जाणारे.

जर्मनीत कोणत्या क्षेत्रात आहेत संधी? 

प्रशिक्षण:-

जर्मन भाषा प्रशिक्षण उपक्रम यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून मुंबईमध्ये 15 केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जर्मन भाषेत शिकण्यासाठी 25 विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10,000 विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे त्यासाठी शासनाकडून खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. या भाषेचे ए १, ए २, बी१, आणि बी २ हे चार स्थर पूर्ण करतील याची खात्री करण्यासाठी सरकार सुमारे ३६ कोटी गुंतवून संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २०० वर्गखोल्या स्थापन करणार आहे.

जर्मन भाषेची 15 केंद्र प्रादेशिक विद्या प्राधिकरण अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील पुढील 15 केंद्रांवर जर्मन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे. श्रीराम वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, अंधेरी पश्चिम; आई.इ.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व; पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व; वेसावा विद्यामंदिर, अंधेरी पूर्व; शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल, अंधेरी पश्चिम; सेंट कोलंबा स्कूल, ग्रँड रोड; डी.एस. हायस्कूल, सायन पश्चिम; वालीराम बेहरूमल मेलवाणी मॉडेल हायस्कूल, ग्रँड रोड पश्चिम; अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी; एस.एस.एम.एम.सी.एम. गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी; ओ.एल.पी.एस. हायस्कूल, चेंबूर; वाणी विद्यालय हायस्कूल, मुलुंड पश्चिम; पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय, कुर्ला पूर्व; शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा, घाटकोपर पूर्व आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी पूर्व.

शासनाकडून मिळणार पासपोर्ट…. ज्या कुशल युवकांनी जर्मनीत जाण्यासाठी निवड होणार आहे त्या युवकांना महाराष्ट्र शासनाकडून पासपोर्ट आणि विजा उपलब्ध करून देण्यात आहे येणार आहे. जर्मनीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांकडे कुठे रोजगार संधी उपलब्ध आहे.

जर्मनी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे .

या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.

जर्मन भाषेसंदर्भात फेरफाराचं शुल्क अर्जदारांना द्यावं लागणार आहे त्यामुळे अर्जदारांनी गांभीर्यपूर्वक अर्ज करायचा आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करायचा आहे.

अर्ज करत असताना स्वतःचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, तसेच नंबर, ईमेल आयडी तसेच सध्याचा कायमस्वरूपी पत्ता यासारखी सविस्तर माहिती भरायची आहे जर्मन भाषेच्या या कोर्ससाठी तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे .

जर्मन भाषेचं संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी लाभणार आहे.

 

फोटो गुगल साभार

Leave A Reply

Your email address will not be published.