श्रीमनोहरनाथ महाराजांनी केलेली श्रीगणेशाची स्तुति.

0 85

श्रीमनोहरनाथ महाराजांनी केलेली श्रीगणेशाची स्तुति.

गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. गणपती हे सर्वांना सुख देणारे आणि सर्व दू:खाचे हरण करणारी देवता म्हणून आपण श्रीगणपतीची पूजा अर्चना करतो. गणपती ही सर्वज्ञात आणि सर्वांची आवडती देवता असून गणपती उत्सवाच्या निमित्ताने कुटुंब एकत्रीकरण, समाज एजत्रीकरण, प्रबोधन, होत असते हे आपण जाणतोच. धर्मातील सण , उत्सवांना एक वेगेळे महत्व असून ते टिकविण्यासाठी आपल्या देशात अनेकानेक साधू , संत, सत्पुरुषांनी धर्मकार्य केले आहे.     

महारुद्र अवतार श्रीदेवनाथ महाराजांनी आपल्या अवतारकार्यात ( सन १७७९ – १८२१) धर्म रक्षणासाठी अनेकानेक मोलाचे कार्य केले. त्याच अखंड ईश्वरीय गुरु शिष्य परंपरेत श्रीदेवनाथ महाराजनांतर, श्रीमनोहारनाथ महाराज हे आठवे श्रीनाथ पिठाधीश्वर होऊन गेलेत. महारुद्र श्रीदेवनाथ महाराजांनी भजन, कीर्तन, अभंग, श्लोक, स्तोत्र आदिची रचना करत समाज प्रबोधनासह धर्मपताका उंचावत ठेवली. धर्मकार्याची तीच तेजस्वी परंपरा आजतागायत सुरू असून विद्यमान श्रीनाथ पिठाधीश्वर श्रीजितेंद्रनाथ महाराज या कार्याचे निर्वहन करीत आहेत. श्रीनाथ गुरु-शिष्य परंपरेत भगवत भक्तिच्या माध्यमातून धर्मरक्षण, समाज प्रबोधन, कुटुंब प्रबोधनाचे कार्य अविरत सुरू आहे.    

 

 

प.पू.श्रीदेवनाथ महाराज.

प.पू.श्रीमनोहारनाथ महाराज.

विद्यमान पिठाधीश्वर प.पू.श्रीजितेंद्रनाथ महाराज.

 

श्रीमनोहारनाथ महाराजांनी ७१ श्लोकांचे श्रीगणेशाचे स्तवन रचून त्यामध्ये सर्वांच्या कल्याणासाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली आहे. अतिशय भक्तिरसपूर्ण अशा ओव्यांनी हे स्तवन रचले आहे.  

श्रीमनोहारनाथ महाराजांनी रचलेल्या गणेश स्तवनात गणपतीला, ओम नमस्ते श्री गणेशा I विद्याधना तू ज्ञानप्रकाशा असे म्हटले आहे. तसेच ओम नमोजी गणनाथा I तूंची पूर्ण आत्मा तत्वता I तूंची कैवल्या सर्वकर्ता I धर्ता अखिल विश्वाचा II असे म्हणून गणपतीची स्तुति केली आहे.

शुद्ध व्हावे जीवित मळीन, काहीसे साधावे निजकल्याण, नरदेह सत्कर्मी व्हावा पावन, विषयी मीपण सरावे..

अवनि – आप, अनिल अनळ, आकाशादि पंचभूते सकळ, तुझे व्यापक रूप विशाळ, लीलानाटकी अकळ तू..

या श्लोकाद्वारे श्रीगणेशाची व्यापकता दर्शविली आहे. 

ब्रम्हयाची तू क्रियाशक्ती, विष्णूची तू पूर्णज्ञानशक्ति, तूच रुद्राची द्रव्यशक्ती,  नीत्य योगी ध्याती ते….

या द्वारे गणराजाच्या शक्तीचे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

धर्मप्रतिष्ठा जगती व्हावी, सौख्याशांती विश्वि नांदावी, भ्रष्टबुद्धी विलया जावी, मनोविकारा नाशुनी….

मनोविकार , भ्रष्ट बुद्धी चा नाश होऊन धर्मनिष्ठा वाढून संपूर्ण विश्वात सौख्य शांति नांदावी. असे जगत कल्याणाचे मागणे मागितले आहे.  

महाविघन्नांचा महादोषांचा, होओ लोप महापापांचा, उदय हो भाव जिव्हाळ्याचा, प्रकाश ज्ञानाचा फाकूनी.. 

ज्ञानाचा प्रकाश जीवनात आल्यानंतर काय होते हे या ठिकाणी संगितले आहे. 

श्रीगणेशाच्या रचलेल्या या स्तवनातील प्रत्तेक ओवीमध्ये भगवतभक्ति, देवाचा आदर , ईश्वर प्रेम , परमेश्वरावर विश्वास , सद्गुरूंप्रती समर्पण असे नानाविध भाव आहेत.   

श्रीमनोहरनाथ महाराजांनी रचलेलेले हे श्रीगणेशाचे स्तवन अतिशय अर्थपूर्ण आहे. पहिल्या काही ओव्यांमध्ये महाराजांनी हे श्रीगणेश स्तवन लिहिण्याचे बळ भगवंताकडे मागितले आहे. पुढील काही ओव्यांमध्ये श्रीगणेशाची स्तुति केली आहे. श्रीगणेशाची व्यापकता, त्याची शक्ति वर्णीली आहे. तर इतर काही ओव्यांमध्ये सर्वांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना केली असून शेवटी फलश्रुति आहे. 

  • नितिन राजवैद्य.

 

Leave A Reply

Your email address will not be published.