स्वातंत्र्य दिन आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास

0

स्वातंत्र्य दिन आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास

भारतीय नागरिक स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी हे दोन्ही राष्ट्रीय सण फार उत्साहात साजरा करतात. पण दुर्दैवाने बहुसंख्य भारतीयांना भारताच्या इतिहासाचे विस्मरण झाल्यामुळे आज भारताच्या एकता आणि अखंडतेची समस्या दिवसन दिवस वाढत चाललेली आहे. आजपर्यंत भारतीय संस्कृतीने भारतातील विविधतेत एकता टिकवून ठेवली होती. पण भारतीय संस्कृती कमकुवत झाल्यामुळे सशक्त झालेल्या भारतातील विविधता आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय नागरिकांमध्ये आस्था, देशप्रेम आणि अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या गौरवशाली इतिहासाचे शिक्षण देणे ही काळाची गरज झाली आहे. भारताची गुलामी, विघटन आणि अधोगतीचे मुळ कारण हेच आहे की भारत आपला प्राचीन इतिहास विसरला. अस म्हणतात की
“If you want to destroy a nation, destroy its history and the nation will be abolished by its own accord.”
“जर तुम्हाला एखाद्या देशाला संपवायचे असेल तर त्याचा इतिहास नष्ट करा आणि तो देश स्वत:च आपोआप संपून जाईल.”
इंग्रजांनी भारतावर राज्य करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून भारताचा इतिहास विकृत करून लिहिला. आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मैक्समूलर ने लिहिलेला भारताचा चूकीचा इतिहास शिकविला जातो. मैक्समूलरच्या आर्य आक्रमक सिध्दांतामुळे भारताला प्राचीन इतिहासच नव्हता असा भ्रम पसरविण्यात आला. कोणतेच प्रमाण नाही मिळाल्यामुळे जगातील अनेक इतिहासकारांनी आर्य आक्रमण सिध्दांताला कपोलकल्पित ठरविले. सिंधु संस्कृतीवर झालेल्या संशोधनात प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक पुरावे मिळाले आहेत. त्याव्यतिरिक्त पौराणिक साहित्यात पण अनेक पुरावे आहेत. भारताच्या इतिहासाची माहिती भारतीय संस्कृती आणि साहित्यात समाविष्ट असल्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासावर संशोधन करून त्याची माहिती सर्वसामान्य भारतीयांना करून देणे आवश्यक आहे.

भारतीय इतिहासात सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृतीचा समावेश केला जातो. त्याच्या पूर्वीच्या काळातील इतिहासकडे कायम दुर्लक्ष केल्यामुळे भारताच्या इतिहासाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. सुरवातीला जगाचा इतिहास लिहिताना इतिहासकारांनी प्राचीन काळाचे पाषाण युग इ.स.पू. 70000 ते इ.स.पू 3300, कांस्य यग इ.प.पू. 3300 ते इ.स.पू 1200 आणि लोहयुग इ.स.पू.1200 च्या नंतरचा कालखंड असे तीन कालखंडात वग्रीकरण केले होते. ऋग्वेद हा प्राचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचा सर्वात जुना पुरावा मानला जातो. या वग्रीकरणा प्रमाणे मॅक्समुल्लरने आर्य आक्रमणाचा कालखंड इ.स.पू 1500 आणि ऋग्वेद निर्मितीचा कालखंड इ.स.पू 1200 ठरविला होता. पण सिंधू संस्कृतीच्या संशोधना नंतर जगाला भारताच्या पूर्व-ऋग्वेदिक काळाच्या इतिहासाची माहिती मिळाली. इतिहासकारांनी मेहरगढच्या उत्खननानंतर सिंधु संस्कृतीचा कालखंडात इ.प.पू., 3300 ते इ.स.पू 1700 च्या ऐवजी इ.प.पू. 7000 ते इ.स.पू 1700 असा बदल केला. सुरवातीला असे मानल्या जात होते की सिंधु संस्कृती आणि वैदिक संस्कृतीमध्ये परस्परसंबंध नही. पण सिंधु संस्कृतीचे उत्खनन ज्या स्थांनवर झाले त्यातील बहुसंख्य स्थाने ऋग्वेदात वर्णित सरस्वती नदीच्या काठी आहे. म्हणूनच सिंधू संस्कृतीला ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’ असे ही म्हणतात. सिंधु संस्कृतीत मिळालेल्या मुद्रेत पृथ्वी देवी ची प्रतिमा, पशुपतिनाथा ची प्रतिमा, शिवलिंग आणि स्वतिक चिह्न असे हिंदु धर्माशी संबंधित अनेक पुरावे सापडले आहे. म्हणजे भारतीय संस्कृती 9000 वर्षांपासून निरंतर चालत आलेली जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. पण फक्त असे वर्गीकरण करून प्रचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे परिपूर्ण विश्लेषण केले जाऊ शकत नाही. या वर्गीकरणात प्राचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील पाषाण युग, हिमयुग, पृथ्वीचा अक्ष कलणे, जलप्रलय आणि कृषी युगाचा समावेश केला गेलेला नाही. या सर्व घटनांचे वर्णन वेद आणि इतर साहित्यात केला गेला आहे. वैज्ञानिकानी पण या सर्व घटनांनची सत्यता पडताळून प्रमाणित केले आहे. या सर्व पुराव्यांवर आधारित भारतीय संस्कृतीचा संपूर्ण इतिहास सर्वसामान्य भारतीयांना करून देणे आवश्यक आहे.

प्राचीन भारतीय संस्कृतीची सुरुवात पाषाण युगातच झाली. पाषाण युगातील प्राचीन भारतीय संस्कृतीचा पुरावा भोपाळजवळील भीमबैठकाच्या लेण्यांमध्ये खडकांवर पेंटिंगच्या रूपात आढळतो. वैज्ञानिकांनी त्याची कालगणना इ.स.पू. 30000 ते इ.स.पू. 9000 पर्यंत अशी निश्चित केली आहे. पाषाण युगातच वैज्ञानिकांनी हिम युगाच्या शेवटच्या टप्पाची कालगणना इ.स.पू. 20000 ते इ.स.स.पू. 12000 इ.स.पू. अशी निश्चित केली आहे. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की हिम युगात बर्फाच्या वजनानी पृथ्वीचा अक्ष कलल्यामुळे पृथ्वीच्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले. परिणामी बर्फ वितळण्यामुळे पृथ्वीवर जलप्रलय आला. जलप्रलयामुळे भारतीयांना उत्तर धुवावर जावे लागले. जिथे त्यानी ऋग्वेदाच्या काही ऋचांची रचना केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांच्या “दि आर्टिक होम इन द वेदाज” या ग्रंथात वैदिक साहित्याचा संदर्भ देऊन आर्यांचे मुळ वस्तिस्थान उत्तर धुव होते अशी मांडणी केली आहे. वेद साहित्यात जलप्रलयाशी संबंधित राजा मनुची कथा प्रसिद्ध आहे. असीच कथा पारशियांच्या अवेस्ता ग्रंथात पण आहे. हिम युगात थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी यज्ञविधी सुरू झाल्या असाव्यात. प्रतिकूल वातावरणामुळे वारंवार स्थलांतर करावे लागल्यमुळे ऋषी मुनिंनी वेद तोडपाठ करून त्यांचे जतन केले. म्हणूनच त्याकाळाची लिपी उपलब्ध नाही. जलप्रलय संपल्यानंतर भारतीय पृथ्वीच्या इतर भागात स्थलांतरित झाले. कदाचित म्हणूनच संस्कृत आणि जगातील इतर भाषांमध्ये समानता आहे. जलप्रलयानंतरच कृषी युग आणि सिंधू संस्कृती सुरू झाली. कृषी युगातील भारतीयांच्या जीवनात स्थिरता निर्माण झाल्यानंतर, प्राचीन भारतीय ऋषी मुनींनी पाषाण युगाचे संचयित ज्ञान लिपीबद्ध केले. त्यानंतरच्या काळातील बरेच पुरावे सापडले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैदिक साहित्यात नमूद केलेली सरस्वती नदीचा शोध. तसेच दक्षिण भारत आणि श्रीलंका यांच्यातील राम सेतु. हा रामायण काळाचा हा पुरावा मानला जातो. त्याचप्रमाणे गुजरातच्या समुद्रात बुडलेल्या श्री कृष्णाची द्वारकेचा शोध देखील एक महत्त्वाचा शोध आहे. हा महाभारत काळाचा पुरावा मानला जातो. रामायण महाभारत काळातील अनेक पुरावे कुरूक्षेत्र, बागपत आणि इतर ठिकाणी सापडले आहे. अनेक पुरावे असूनदेखील भारतात आज प्राचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला विरोध केला जात आहे.

प्राचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासची संपूर्ण माहिती जर सर्वसामान्य भारतीयांना करून दिली तर त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. भारताच्या सिंधू, सरस्वती आणि इतर नद्यांच्या काठावर अनेक जनजाती वसलेल्या होत्या. त्यांच्ये आचार विचार, आहार विहार, चाली रिती, प्रथा परंमपरा, सण उत्सव, आणि भाषा उपासना पद्धती परस्पर भिन्न होत्या. प्राचीन भारतीय ऋषी मुनींनी सर्वसमावेशक तत्वानी सर्व जनजातींना जोडून एक व्यापक जीवनपद्धती तयार करण्याचे अशक्य कार्य केले. त्याच प्रमाणे ऋषी मुनींनी सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि विविधतेत एकता या तत्वांनी त्या प्राचीन भारतीय संस्कृतीत आस्तिक, नास्तिक, निर्गुण निराकार पूजा पध्दती, सगुण साकार पूजा पध्दती, एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी, वेद प्रमाण्यवादी, वेद विरोधक, द्वैतवादी, अद्वैतवादी, विविध प्रकारच्या पूजा पद्धती, शैव, वैष्णव, शाक्त आणि स्मार्त पंथ, धार्मिक ग्रंथ, साधु, संत, वंश, वर्ण, प्रांत, भाषा, जाति आणि अनेक विचारधारांचा समावेश करून सर्वसमावेशक संस्कृती निर्माण केली. त्या व्यतिरिक्त ऋषि मुनिनी प्राचीन भारतीय जीवनपद्धतीला निसर्गाशी जोडण्यासाठी त्यात सूर्य, पृथ्वी, चंद्र, ग्रह, पर्जन्य, वायु, अग्नि, पर्वत, नद्या, वृक्ष, पाने, फळे, फूले, पशु, पक्षी आणि वनस्पतीचा समावेश केला. इतकेच नव्हते तर शक, हूण, कुशान आणि पारशी लोकांना पण भारतीय संस्कृतीत सामावून घेतले.
या संबंधात एक प्रसिद्ध उध्दहरण आहे –
“Western scholars regard Hinduism as a fusion or synthesis of various Indian cultures and traditions, with diverse roots and no single founder.”
“पाश्चिमात्य विद्वान मानतात की हिन्दू धर्म विविध संस्कृती आणि परंपरांचा संयोग आहे, ज्याची मूळे भिन्न आहे आणि कोणी एक संस्थापक नही.”
हिन्दू धर्म अनेक संप्रदायांचा, विचारधारांचा आणि संस्कृतींचे संगठन आहे म्हणून हिन्दुधर्माला जीवनपद्धती मानतात. भारताच्या सर्वोच्य न्यायालयने पण ’हिन्दू धर्म नसून एक जीवनपद्धती आहे’ असा निर्णय दिला आहे. जगातील अनेक देशांनी धर्म आणि विचारसरणी बदली पण आपल्या इतिहास नाही विसरले. भारताला पुन्हा विश्व गुरू बनविण्यासाठी स्वातंत्र्य दिनापासून आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा जपून ठेवण्यासाठी संकल्प करू.

लेखक हे धर्म, संस्कृती, इतिहास आणि सामाजिक विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. मो.- ९९२३२९२०५१.

Leave A Reply

Your email address will not be published.