तरूणाईचा संकल्प
फोटो गुगल
‘*छोडो कलकी बाते कल की बात पुरानी
नये साल में लिखेंगे हम मिलकर नई कहानी’*
नवीन वर्ष म्हणजे उत्साह, उत्सव, धमाल सगळीकडे अगदी आनंदी वातावरण व नवीन उत्कंठा असते की हे नवीन वर्ष कसं जाईल? आणि सोबतच असतो तरुणाईचा संकल्प. ज्याची आजच्या पीढीमध्ये भयंकर क्रेझ आहे. तरूणाई म्हणजे सळसळते रक्त. या जोशात संकल्प घेतला जातो. झिरो फिगर, सिक्स पॅकचा विचार करुन फिट राहण्याकरिता जिम,सूर्य नमस्कार करून फिट राहण्याचा संकल्प केला जातो. शिवाय माझी फॅशन कोणी का ठरवावी? माय कम्फर्ट इज माय फॅशन हा अॅटीट्युड घेवून तरुणाई आपला संकल्प घेताना दिसते. सोबतच
*मिले सूर मेरा तुम्हारा तो, सूर बने हमारा’*
नुसार काही तरुण मंडळी नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये सामाजिक कार्यामध्ये हातभार लावण्याचा संकल्प घेताना दिसून येते आहे.
*पापा कहते है बडा नाम करेगा,
बेटा हमारा ऐसा काम करेगा’ *
यंदा काहीतरी करूनच दाखवायचं म्हणून स्वत:मध्ये काही चांगले रिजोलेशन्स ठरविले जातात. आपले व्यक्तिमत्व उभारून येण्यासाठी काही संकल्प घेतले जातात. पण रूटीन लाइफमध्ये वर्षाच्या सुरूवातीला केलेला संकल्प वर्षाच्या शेवटपर्यंत टिकवून त्यातून काही साध्य झाले तर केलेला संकल्प फळास जाईल. फक्त चांगले संकल्प ठरवून होणार नाहीत, तर ते पूर्ण झाल्यास अर्थपूर्ण होतात.
पल्लवी प्रकाश