अतांत्रिक शाखा आणि तंत्रज्ञानातील संधी
मी अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये तांत्रिक प्रयोगशाळा प्रस्थापित केलेल्या आहेत.मुख्यतः शाळांमध्ये पहिली पासून ते नववी पर्यंत रोबोटिक्स व तंत्रज्ञानावर आधारित मी पुस्तके लिहिली आहेत, तीच मी रोबोटिक्स च्या सेटअप बरोबर शिकविण्याकरिता देत असते.त्यात इलेक्ट्रॉनिक्स च्या करंट/वोल्टेज, सेन्सर्स, मायक्रोकंट्रोलर पासून ते मेकॅनिकल च्या गिअर्स,कायन्यामटीक्स, इलेक्ट्रिकल च्या विविध सप्लाय, विविध मोटर्स, कम्प्युटर सायन्स च्ये अल्गोरिथम्स आणि विज्ञान आणि गणिताच्या विविध प्रमेयनपर्यंत सर्व सामावलेले असते.
हे करत असताना अनेक पालकांबरोबर आणि शिक्षकांबरोबर संपर्क आला आणि त्यांचे अनेक प्रश्नही आलेत, त्यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता कि आमच्या मुलांना जर इंजिनिअर बनायचे नसेल कला/वाणिज्य/वैद्यकीय किंवा कायद्याच्या क्षेत्रात जायचे असेल तर आमच्या मुलांनी तांत्रिक शिक्षण का घ्यावे?
तसेच महाविद्यालयातील याच क्षेत्रातील मुलांकडून देखील “हे आमचे क्षेत्र नाही तर आम्हाला काय आवश्यकता आहे तो विषय शिकण्याची” हे उत्तर ऐकावयास मिळाले. आणि म्हणूनच काळाची गरज ओळखून ह्या प्रश्नच उत्तर देणं मी गरजेचं समजते.
वाणिज्य/ कला/वैद्यकीय/कायद्याच्या पदवीधरांनी तंत्रज्ञानाविषयी जाणुन घेणे व शिकणे का आवश्यक आहे?
तर्कशास्त्र, उत्पादनाचा व्यावसायिक पैलू, त्याचे बाह्यस्वरूप तसेच तंत्र-व्यावसायिक सायबर ह्या सर्व क्षेत्रांमध्ये नेहमीच वरील क्षेत्रातील उत्तम पदवीधरांची गरज भासते. जेव्हा एखाद्या उत्पादनाच्या व्यवसायिकीकरणाची वेळ येते तेव्हा तिथे एखाद्या वाणिज्य पदवीधराची भूमिका गरजेची ठरते तिथे कोणताही अभियंता कामी पडू शकत नाही.
आजकाल तंत्रज्ञान व त्याचा वापर अत्यंत वाढला आहे, तांत्रिक उत्पादनांची संख्या वाढली आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही उत्पादन व्यवसायिकीकरण्यासाठी वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांची गरज असते पण त्यांना त्यांच्या शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाचे ज्ञान असणेही तेवढेच गरजेचे असते.
हा दुहेरी कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या वाणिज्य अभ्यासाला तंत्रज्ञानाच्या कुशलतेसोबत एकत्रित करतो. जेणेकरून ते इ-कॉमर्स च्या क्रांतीत सहभागी होऊ शकतील.
जर वाणिज्य किंवा कायद्याच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मूलभूत तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले तर त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या शाखा विस्तारायला मदत होईल आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला उद्याच्या उज्वल भारताचे कौशल्यपूर्ण शिलेदार तसेच उद्योजक मिळतील.
सांगताना वाईट वाटते पण हि वास्तविकता आहे (ज्याला काही अपवाद हि आहेत) आपल्याला खालील वाक्ये ओळखीची असतील,
“विज्ञान निवडण्यासाठी पुरेसे गुण मिळवण्यात असमर्थ असलेले विद्यार्थीच वाणिज्य/कला शाखा निवडतात.”
“वाणिज्य शाखेत, माझ्याजवळ सीए, सीएस आणि बी.कॉम सारख्या मर्यादित पर्याय आहेत”
“केवळ व्यावसायिक-श्रेणीतील कौटुंबिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांनीच विज्ञानाचा विचार केला पाहिजे”
वरील विधाने प्रत्येक वेळी खरी असतीलच असे नाही पण सत्यही नाकारता येत नाही. आताचI काळ तंत्रज्ञानाचा आहे , करिअर संधी वाढवायच्या असतील तर प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे ज्ञान घ्यायलाच हवे तेव्हाच कुठे ते येणाऱ्या काळात टिकून राहू शकतील. उदा. आयओटी, एम्बइडेड सिस्टिम, रोबोटिक्स चे प्रोडक्टच्या डिजिटल मार्केटिंग च्या जॉब ची संधी असेल आणि जर त्यांची त्यांना आधीपासून माहिती असेल तर नक्कीच ते काम त्यांना मिळेल.
कला शाखेतील ते विद्यार्थी ज्यांची कल्पना शक्ती अफाट आहे,ज्यांना वस्तूच बाह्यरूप कस खुलवता येईल हे कळत, एखादी वस्तू पाहताच त्याला कस सुशोभित करायचं हा विचार त्यांच्या डोक्यात येतो, पण हे फक्त अतांत्रिक उत्पादांच्याच बाबतीत आहे.
जर तुम्हाला एखाद्या छोट्या रोबोटिक कार ची डिसाईनिंग किंवा त्याचे स्वरूप कसे असायला हवे हे विचारले तर तुम्ही सांगू शकाल का?
सांगू शकाल जर तुमच्या कडे त्याबद्दल पुरेसे ज्ञान असेल.तंत्रज्ञानाचं मूलभूत ज्ञान हे सर्वांनाच असायला हवे.
वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीराचा अभ्यास करने जेवढे गरजेचे आहे तेवढेच वैद्यकीय उपकरणांचा अभ्यास करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. जसे पल्स ऑक्सिमीटर, ईसीजी, स्केलर,डायलिसिस,सिटीस्कॅन, क्स-रे, डायथर्मी, रेडिओलॉजिकल इन्स्ट्रुमेंट, मल्टिपारा मॉनिटर आणि सर्वच. प्रत्येक उपकरणांचं निदान कार्य व नियंत्रण तरी समजायलाच हवं.
आज प्रत्येक क्षेत्र हे कुठे ना कुठे तंत्रज्ञानाशी जुळलेले आहे.
म्हणूनच, आपण जर 10 वी नंतर आपली शाखा निवडण्याचे विचार करीत असाल, किंवा आधीच वाणिज्य/कला/वैद्यकीय/कायदा यापैकी कुठलेही क्षेत्र निवडलेले असेल, आणि आपल्याला करिअर कुठे करावे याबद्दल खात्री नसेल, तर आम्ही आपल्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील वरील शाखेंशी संबंधित रोमांचक आणि आकर्षक करिअर संधी सादर करत आहोत. ज्यामध्ये टेक इकोनॉमिकस वाणिज्य आणि कायद्याच्या क्षेत्रासाठी, बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि कला शाखेसाठी अस्थेटिक अँड कॉस्मॅटिक लूक डिसाईनिंग ऑफ मशीन यांचा समावेश आहे.
“आम्ही KITS मध्ये तेच स्किल्स शिकवतो ज्यांची तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत किंमत असेल.”
- काजल राजवैद्य
CEO & FOUNDERKITS Tech Learning Center.
International Robotic Trainer.