मुकेश अंबंनींनी राखले पहिले स्थान

0

मुकेश अंबंनींनी राखले पहिले स्थान

यआयएफएल वेल्थ हुरून इंडिया ने चालू वर्षातील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यादीसाठी ९५३ व्यक्तींनी कमीत कमी  १ हजार कोटी रुपये संपतीचा उंबरठा ओलांडला आहे. असे आयआयएफएल वेल्थ आणि हरून रिपोर्ट ने आपल्या ८ व्या प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालातील पहिले दहा व्यक्ति होण हे आपण पाहूया.

  1. मुकेश अंबानी, चेअरमन रिलायन्स इंडस्ट्रिज लि. यांनी या यादीत आज पर्यंतच्या आठ प्रकाशित झालेल्या अहवालात आपले प्रथम स्थान कायम ठेवले असून यांची संपत्ति ३,८०,७०० कोटी रुपये एवढी आहे. जिओ लोंचिंग मुळे रिलायन्स ही टेलिकॉम क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.

 

  1. एस पी हिंदुजा आणि परिवार, चेअरमन हिंदुजा ग्रुप. यांनी सुद्धा या यादीत आपले दुसरे स्थान पटकावले असून  यांची संपत्ति तब्बल १,८६,५०० कोटी रुपये आहे. ही कंपनी इम्पोर्ट अक्स्पोर्त, ट्रेडिंग, मोटर वाहन, कॉल सेंटर, हेल्थ केअर आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे.

 

  1. अजीम प्रेमजी, चेअरमन विप्रो लि. ने या यादीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. यांची संपत्ति १,१७,१०० कोटी रुपये आहे. विप्रो ही कंपनी सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी मध्ये जगातविख्यात कंपनी आहे.

 

  1. लक्ष्मी मित्तल आणि परिवार, चेअरमन आरसेलर मित्तल. यांनी आपल्या १,०७,३०० कोटी रुपये संपत्ती सह आपले चौथे स्थान घेतले आहे. ही कंपनी जगातली एक नावाजलेली स्टील निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते.

 

  1. गौतम अडाणी आणि परिवार, अडाणी ग्रुप. यांची संपत्ती ९४,५०० कोटी रुपये असून हे या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. अदाणी ग्रुप हा वीज निर्माता, रियल इस्टेट, कामोडेटीज, कोल आणि फोर्ट मध्ये काम करणारी अग्रणी कंपनी आहे.

 

  1. उदय कोटक, सिईओ आणि एमडी, कोटक महिंद्रा बँक. हे या यादीत सहाव्या स्थानावर असून यांची संपत्ती ९४,१०० कोटी रुपये आहे. कोटक महिंद्रा बँक ही एक अग्रणी खासगी बँक आहे.

 

  1. सायरस एस पूनावाला, चेअरमन पूनावाला ग्रुप. हे सातव्या स्थानावर असून संपत्ती ८८,८०० कोटी रुपये इतकी आहे. पूनावाला ग्रुप मधील सिराम इंस्टीट्यूट हे लहान मुलांचे लसीकरण निर्माण करणारी मोठी कंपनी आहे.

 

  1. सायरस पालोमजी मिस्त्री, शापुरजी पालोनजी ग्रुप. हे आणि शापुर पालोनजी मिस्त्री, शापुरजी पालोनजी ग्रुप. हे दोघेही एकाच स्थानावर आहेत. दोघांचीही संपत्ती ७६,८०० कोटी रुपये आहे.

 

  1. 8/9 शापुर पालोनजी मिस्त्री, शापुरजी पालोनजी ग्रुप. संपत्ती ७६,८०० कोटी रुपये. बांधकाम, टेक्स्टाइल, होम आपलायन्सेस,     शिपिंग, पब्लिकेशन, ऊर्जा आणि बायोटेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रात कार्यरत शापुरजी पालोनजी हा ग्रुप कार्यरत आहे.

 

  1. दिलीप संघवी, सन फार्मा. हे दहाव्या स्थानावर असून यांची संपत्ती ७१,५०० कोटी रुपये आहे. सन फार्मा ही कंपनी  जागतिक चौथ्या स्तरावरील जनेरीक निर्माता कंपनी आहे.

 

टिम- लोकसंवाद.कॉम

 

Leave A Reply

Your email address will not be published.