आहार शास्त्रामध्ये उपवासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ऋतु मानांनुसार आपला आहार असावा असे आहारशास्त्र सांगते. मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनात उपवास करावा यासाठी वेगवेगळ्या रूढी- परंपरा च्या माध्यमातून आपल्याला त्याचे महत्व संगितले जाते. उपवासाने आपले शरीर, मन, बुद्धी, आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
नवरात्री उत्सवामध्ये अनेक लोक उपवास करतात. उपवास करतात म्हणजे काय करतता ? उपवास कशासाठी करतात ? उपवास कसा करतात ? याचा जर बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल की अनेक लोक उपवास करून आपल्या शरीरावर, मनावर आणि आरोग्यावर अन्याय करतता. यापेक्षा उपास न केलेला बरा असे वाटू लागते.
आरोग्याच्या दृष्टीने उपवास करणे म्हणजे आपल्या दैनंदिन आहारात बदल करणे होय. जामुळे शरीराला आवश्यक तो बदल मिळेल आणि आवश्यक ती जीवनसत्वे मिळतील. आपआपल्या आवशकते नुसार, क्षमते नुसार, आपण उपास करू शकतो. आठवड्यातला एक दिवस उपाशी राहून , असे शक्य नसेल तर फळ किवा फळाचा रस घ्या, हेही शक्य नसेल तर एक वेळ जेवण करा, कमी जेवा. परंतु उपवासाच्या नावावर नको नको ते खाणे आणि दिवसभर खाणे टाळा.
उपवासाच्या दिवसांमध्ये आपल्या आहारा मध्ये काय असावे हे आपण पाहू –
- आपल्या आहारात भरपूर प्रमाणात फळांचा उपयोग करावा जेणेकरून आपल्याला आवश्यक असणारे विटामीन आणि खनिजे त्याद्वारे आपल्याला मिळतात.
- दूध व दुधाचे पदार्थ (ताक,दही,पनीर)इत्यादि पदार्थाचा वापर आपल्या आहारात केल्यास प्रथिने व कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळून आपले स्ंनायु बळकट होतील.
- निंबू पाणी,नारळ पाणी,फळांचा रस यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीरस आवश्यक असणारे एलेक्त्रोल्यतेस योग्य प्रमाणात मिळते.
- नवरात्रमध्ये अनेक लोक उपवास करतात. या दिवसात योग्यप्रकारे उपवास केल्याने सकारात्मक परिणाम पाहाला मिळतात.
- लठ्पणा कमी करण्यासाठी उपवास हा एक छगला पर्याय आहे. योग्य आहार घेऊन या नवू दिवसात वजन नियंत्रणात करू शकता.
- या दिवसांमध्ये कमी क्यालरीज घेतल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त क्यालरीज बर्न होण्यास मदत होते.
- उपवासाच्या दिवसांमध्ये आपण आपल्या आहारात खजूर,अंजीर,मनुका,शेगदाणे, खोबर यासारख्या सुकामेवा व तेलबिया मध्ये असंनार्या पोष्टिक घटकांमुळे आपल्या त्वचेचे व केसांचे सुद्धा आरोग्य चांगले होते.
- उपवास केल्यामुळे काही सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतात त्यापाकीच एक म्हणजे आपले वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते मात्र त्यासाठी आपला आहार योग्य व योग्य त्या प्रमाणात असावयास हवा .
- भगर शिंगाडा,उपवास भाजणी,रताळी,लालभोपळला, गूळ–शेंगदाणे,राजगीरा,फळे, सुकामेवा,दूध व दुधाचे पदार्थ इत्यादीचा आहारात समावेश करावा.
- पण मात्र आपण उपवास करताना आपल्या आहारात तळलेले पदार्थ,चिप्स,साबुदाणा पापड, तळलेला चिवडा,साबूदाण्याची उसळ खूप गोड पदार्थ हे पदार्थ टाळावेत.
- लहान मुलांनी,गरोदर माता,स्थनदा माता, वृद्ध व्यक्ति,आजारीव्यक्ति,मधुमेह असणारे, हृदयाशीसबधित आजार असणार्यांनी उपवास करू नये.
आहारतज्ञ
जया अहेरकर / गावंडे
काळे क्लिनिक आणि स्मितास इन्फेर्तिलीटी सेंटर,
औरंगाबाद