आढावा विधानसभेचा – विदर्भ विभाग

विधानसभा निवडणूक १९

0 387
  • विदर्भ विभाग –

 विदर्भात एकूण ११ जिल्हे व ६२ विधानसभा मतदार संघ आहेत.

त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ०७ विधानसभा मतदार संघ, अकोला जिल्हात ०५, वाशिम जिल्हात ०३, अमरावती जिल्हात ०८, वर्धा जिल्हात ०४, नागपूर जिल्हात १२, भंडारा जिल्हात ०३, गोंदिया जिल्हात ०४, गडचिरोली जिल्हात ०३, चंद्रपुर जिल्हात ०६ व  यवतमाळ जिल्ह्यातील ०७ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

विदर्भात सर्वच प्रमुख पक्षांनी आपापसात अनेक मतदारसंघात बदल करत आपले उमेदवार रणांगणात उतरवले आहेत. यामध्ये महायुती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी,  मनसे अशा विविध राजकीय पक्षांचा समावेश आहे.

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पारंपारिक दक्षिण – पश्चिम  मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांचे विरोधात कॉंग्रेस चे आशिष देशमुख उभे आहेत. याआधी आशीष देशमुख काटोल मतदार संघातून भाजपा चे आमदार होते. परंतु यावेळी ते कोंग्रेस कडून थेट देवेन्द्र फडणवीस यांच्या विरोधात मैदानात उतरले आहे.
  • साकोली मतदारसंघातून महायुतीने परिणय फुके यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांचे विरोधात भाजपातून कोंग्रेसवासी झालेले व मागच्या लोकसभेला नितिन गडकरींच्या विरोधात उभे असलेले नाना पटोले हे मैदानात आहेत. परिणय फुके विरोधात नाना पटोले अशी लढत पाहायला मिळेल.
  • अमरावती जिल्ह्यात भाजपा ने विद्यमान आमदार एकेकाळी कोंग्रेसचे मंत्री असणारे सुनील देशमुख यांना परत उमेदवारी दिली असून यांचे विरोधात कॉँग्रेसच्या सुलभा खोडके ह्या रिंगणात आहेत. ही लढत उत्सुकतेची राहील असे दिसते कारण दोघांनाही कोंग्रेस मतदार कोठे कसे फोडायचे हे माहीत असून दोघांनाही  मानणारा कार्यकर्ता व मतदार वर्ग या मतदार संघात आहे. त्यामुळे जनता नेमका कुणाला कौल देते हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
  • धामणगांव मतदार संघात विद्यमान कोंग्रेस चे आमदार विरेन्द्र जगताप मैदानात असून यांचे विरोधात गेल्या विधानसभेला थोड्या  मतांनी विजयी न झालेले  अरुण अडसड यांचे चिरंजीव प्रताप अडसड हे भाजपा चे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. प्रताप अडसड हे न.प. अध्यक्ष असून स्थानिक तरुणांशी  जुळलेले आहेत. यावेळी वीरेंद्र जगताप आपला विजय राखतात कि प्रताप अडसड बाजी मारतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
  • अकोला जिल्ह्यात आकोट मतदार संघातून जनतेचा विरोध दिसताना सुद्धा  विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपाने उमेदवारी दिली असून कोंग्रेस चे संजय बोडखे हे त्यांचे विरोधात मैदानात आहेत. वंचित आणि मनसे ने सुद्धा या ठिकाणी आपापले उमेदवार उभे केले असून वंचितला मानणारा मोठा मतदारवर्ग या मतदार संघात आहे. त्यामुळे  भाजपला आपला गड राखण्यात चांगलीच कसरत करावी लागेल असे दिसते.
  • वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदार संघात कोंग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक हे मैदानात असून त्यांचे विरोधात शिवसेनेचे विश्वनाथ सानप हे आहेत. भाजपने आपला पारंपरिक मतदारसंघ सेनेला दिला असून या वेळी सेना येथे आपला झेंडा फडकवेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचितचे दिलीप जाधव यांनी सुद्धा मैदानात उडी घेतली असून वंचितला मानणारा मोठा मतदार याभागात आहे. त्यामुळे नेमके कोण विजयी होईल हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
  • बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघात कोंग्रेस चे  विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांचे विरोधात महायुतीने श्वेता महल्ले  हा नवीन चेहरा दिला आहे. महल्ले ह्या जी.प. सभापती आहेत व त्यांनी दरम्यानच्या काळात बरीच तयारी केलेली दिसते. तसेच राहुल बोंद्रे सुद्धा दोन टर्म पासून या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे परत बोंद्रे कि महल्ले अशी लढत पाहायला मिळत आहे.

पुढील लेखात पाहूया मराठवाडा  विभागातील काही मतदार संघाच्या लढती. त्यासाठी लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा.

 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.