विद्येची देवता आई सरस्वती.
श्रेष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी सरस्वती देवीला माझी आई म्हणतात आणि तिने मला शिकवलं असे त्या म्हणतात…
त्या आपल्या कवितेत म्हणतात –
माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता –भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!
एकही वर्ग न शिकलेल्या बहिणाबाई ज्यांनी असंख्य साहित्याची निर्मिती केली त्यांना माता सरस्वतीला स्वाभाविकपणे आपली आई म्हणावे वाटले आणि ती आपल्याला बोली शिकवते असे त्या मान्य करतात.
अमेरिकेतील वाशिंग्टन मधील सरस्वतीची मूर्ती हि एक बोलके उदाहरण म्हणावे लागेल.-
इंडोनेशिया या एका मुस्लीम धर्मीय बहुल देशाच्या सरकार ने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला दिलेले हि विद्येची देवता माता सरस्वतीची मूर्ती.
स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई ज्योतीराव फुले ह्या माता सरस्वती बद्दल काय म्हणतात हे खालील त्यांच्या कवितेमध्ये स्पष्ट होते.
( महाराष्ट्र शासन प्रकाशित, सावित्रीबाई फुले समग्र वांड:मय )
खरं तर पुरस्कार नाकारणे किंवा स्वीकारणे हे व्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. परंतु पुरस्कार स्वीकारण्याची वेळ आल्यावर तो पुरस्कार एखादे कारण देऊन नाकारणे हा निव्वळ आयोजकांची फजिती करण्याचा आणि प्रसिद्धी करिता केलेला केविलवाणा प्रयत्न म्हणावा का ?. विद्येची देवता माता सरस्वतीचा फोटो आयोजकांनी ठेवला म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा “जीवनव्रती ” पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी नाकारला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने ९८ व्या वर्धापन दिन समारंभाचे आयोजनात हा पुरस्कार देण्याचे ठरले होते.
खरे तर हा पुरस्कार जेव्हा त्यांनी स्वीकारायचे ठरवले तेव्हा त्यांना सरस्वतीच्या फोटो बद्दल कल्पना नव्हती का ? आयोजकांना तसे त्यांनी कळवले होते का ? कळवले असेल तर आयोजकांचे त्यावर काय म्हणणे होते ? असे अनेक प्रश्न या घटने नंतर समोर येतात. ते काहीही असले तरी, या देवी सर्वभूतेषु बुद्धि रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥ हे मात्र खरे !